औरंगाबाद | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर शिवसेना नेते संजय राठोड यांनी समोर येत आपली प्रतिक्रिया दिली. संजय राठोड तब्बल 15 दिवसांनंतर पुढे आले आणि यावर आपलं मत मांडलं. संजय राठोड पोहरादेवीच्या दर्शनासाठी आले तेव्हा त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याच पार्श्वभूमीवर एक शिवप्रेमी महिलेने यावरून सरकारवर टीका केली आहे.
आम्हाला शिवजयंती साजरी करू दिली नाही पण पोहरागडावरती संजय राठोडांच्या समर्थकांची हजारोंच्या संख्येने गर्दी झाली. हेच का समसमान वाटप आता कारवाई कोणावर?, असा सवाल पूनम राऊत या शिवप्रेमी महिलेने केला आहे. यावरून सोशल माध्यमांवरही नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे.
अवघ्या महाराष्ट्राचं दैवत अललेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध लावले होते. यावरू राज्य सरकारवर शिवभक्तांनी टीका केली होती. शिवजयंतीला 100 जणांपेक्षा जास्त गर्दी करायची नाही, सामाजिक कार्यक्रम करायचे नाहीत आणि इ. या नियमांमुळे सरकारवर विरोधी पक्षानेही जोरदार टीका केली होती.
दरम्यान, संजय राठोड पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. संजय राठोड यांनी पोहरादेवी या गोर बंजारा समाजाच्या काशी मानल्या जाणाऱ्या धार्मिक क्षेत्रावर जाऊन त्यांनी आधी दर्शन घेतलं. यावेळी त्यांचे कुटुंबिय त्यांच्यासोबत होतं. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाबाबत बोलताना विरोधी पक्षांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
थोडक्यात बातम्या-
राज्याचे मुख्यमंत्री सामाजिक दबावाला बळी पडत आहेत का?- प्रवीण दरेकर
‘मी गायब नव्हतो तर या काळात मी…’; संजय राठोडांनी दिलं स्पष्टीकरण
15 मेपासून व्हाॅट्सअप वर मेसेज पाठवता येणार नाही!, जाणून घ्या नविन पाॅलिसीबाबत
आई रागावल्यानं मुलगी घराबाहेर पडली, नराधमांच्या कृत्यानं माणुसकी ओशाळली!
सनी लिओनीमुळे नेटकरी घायाळ, ‘हे’ फोटो पहायला वन मिलियन लोकांच्या उड्या…