November Rules Changes l दिवाळी सणाला सुरवात झाली आहे. मात्र या सणासुदीच्या काळात म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात अनेक नियम बदलणार आहेत. त्यामुळे आर्थिक नियमांसह अनेक वस्तूंच्या किमतीत देखील बदल होणार आहेत. या सर्व बदलांचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. मात्र आता नोव्हेंबर महिन्यात कोणते नियम बदलणार आहेत हे आपण जाणून घेऊयात…
गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ होणार? :
एलपीजी सिलेंडरची किंमत दर महिन्याच्या पहिल्या दिवशी अपडेट केली जाते. देशातील प्रमुख तेल विपणन कंपन्या त्यांच्या किमती अपडेट करत असतात. गेल्या तीन महिन्यांपासून व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ऑक्टोबरमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 48.50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. मात्र यावेळी 14 किलोच्या सिलिंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.
एलपीजी सिलिंडरच्या किमतींसोबतच 1 नोव्हेंबर 2024 रोजी एटीएफ आणि सीएनजी-पीएनजीच्या किमती अपडेट केल्या जाणार आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून एटीएफच्या किमतीत घट झाली होती. यावेळीही दरात घट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सीएनजी आणि पीएनजीच्या किमतींमध्ये बऱ्याच काळापासून कोणताही बदल झालेला नाही. मात्र, आता त्या किमती बदलण्याची शक्यता आहे.
November Rules Changes l स्टेट बँक ऑफ इंडियाचे नियम बदलणार :
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. 1 नोव्हेंबरपासून असुरक्षित SBI क्रेडिट कार्ड्सवरील वित्त शुल्क 3.75 टक्के असेल. तसेच जर तुम्ही युटिलिटी सर्व्हिसेसमध्ये 50,000 रुपये जास्तीचे पेमेंट केले तर 1 टक्के अतिरिक्त शुल्क लागणार आहे.
अशातच आता बाजार नियामक सेबीने म्युच्युअल फंडातील इनसाइडर ट्रेडिंगचे नियम कडक केले आहेत. नवीन नियमानुसार, ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज (AMCs) किंवा त्यांच्या नातेवाईकांना 15 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या व्यवहारांची माहिती द्यावी लागणार आहे.
News Title – Rules Changes in november
महत्त्वाच्या बातम्या-
तिकीट न मिळाल्याने नाराजी, मुंबईत महायुतीच्या तीन जागांवर बंडखोरी
आत्महत्येची भाषा करणारे आमदार वनगा कालपासून बेपत्ता, मुख्यमंत्र्यांचा तातडीने फोन
मनसेची सातवी यादी जाहीर, पारनेरमध्ये लंकेंविरोधातही दिला उमेदवार
अजित पवार गटाची चौथी यादी जाहीर, महायुतीत NCP ला किती जागा मिळाल्या?
आज धनत्रयोदशी, देवी लक्ष्मी ‘या’ राशींवर करणार धन-सुखाचा वर्षाव!