बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली जाहीर; वाचा काय आहेत नियम

पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले होते. अजूनही तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका कायम असल्यानं यंदाही साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्यात यावा, असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. कोरोनाचं सावट असतानाच आता पूरामुळे अनेक जनजीवनही विस्कळीत झाले आहे. अशातच पुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. कोरोनाचा अंदाज घेता यंदाच्या पुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

नियमावली –

  • सार्वजनिक गणेशमूर्ती 4 फूट आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची 2 फूटांची मर्यादा असावी.
  • श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
  • गणेशोत्सव काळात कोरोनाच्या नियमांमध्ये शिथिलता दिली जाणार नाही.
  • आरती, भजन, किर्तन अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. 
  • गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित, सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना.
  • आगमन मिरवणूक आणि विसर्जन मिरवणूकीवर पूर्णपणे बंदी असणार आहे.  

यंदा गणेशोत्सव जल्लोषात आणि नेहमीच्या थाटात साजरा होईल, अशी आशा होती, मात्र कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेता यंदाही गणेशोत्सव अगदी साधेपणानं साजरा होणार आहे. त्यामुळे गणेशभक्त नाराज झाले असल्याचं चित्र दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या –

संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट; ठाकरे सरकारच्या कामावर राहुल गांधी समाधानी

उद्धव ठाकरे आणि संभाजी भिडेंची बैठक, बंद दाराआड झाली चर्चा

ग्रामसेवकांची रिक्त पदे भरण्यात येतील- अजित पवार

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

‘सिंधूला थार भेट द्यावी’, युजरच्या मागणीवर आनंद महिंद्रा म्हणाले, ‘तिच्या गॅरेजमध्ये…’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More