Top News अहमदनगर महाराष्ट्र

‘कोरोनाच्या नियमांचं पालन होत नाही जर कोरोना वाढला तर…’; शरद पवारांनी व्यक्त केली ‘ही’ भीती

अहमदनगर | कोरोना अजून संपलेला नाही. कोरोनाचे नियम अजून लागू आहेत. मात्र लोकांकडून नियमांचं पालन होत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, तर देशाची अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात येऊ शकते. त्यामुळं नागरिकांनी नियमांचं पालन करावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे.

अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात पवार बोलत होते. त्यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदी अधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले की,”दो गज दुरी, मास्क है जरूरी, अशी जागृती केली जाते. मात्र, कार्यक्रमात तर सर्वजण खांद्याला खांदे लावून बसलेले आहेत. अनेकांच्या तोंडाला मास्कही नाहीत.”

कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे नगर जिल्ह्यातील प्रमाण हे देशातील प्रमाणापेक्षा चांगलं असून, ते 97 टक्के इतके आहे. ही गोष्ट चांगली असली, तरी कोरोना अजून संपलेला नाही, हे लोकांनी ध्यानी घेतलं पाहिजे. युरोपमध्येही परिस्थिती गंभीर असून, इंग्लंडमध्येही 35 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला असल्याचं पवारांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

‘तुमच्या शक्तीचा उपयोग करुन मुलाचं मन वळवा’; शेतकऱ्याचं मोदींच्या आईला पत्र

“तमिळनाडूचं भविष्य इथले युवा ठरवतील, त्यांच्या मदतीला आता मी आलो आहे”

ममता बॅनर्जींचा वीक पॉइंट भाजपने ओळखलाय, दीदींनी चिडायला नव्हत पाहिजे- संजय राऊत

“ज्यांच्याबरोबर लढायचं त्यांचेच लोक फोडून फौज तयार करायची”

बॉयफ्रेंडसाठी सख्ख्या मैत्रिणीची केली हत्या; हत्येचं कारण ऐकून पोलीसही हादरले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या