Rupali Chakankar l विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होताच सर्व राजकीय पक्षांनी तयारीला सुरवात केली आहे. अशातच आता निवडणुकीच्या आधीच राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा रुपाली चाकणकर यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नियुक्तीचं गॅझेट प्रसिद्ध :
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पदाचा कार्यकाळ हा 22 ऑक्टोबर 2024 या तारखेला संपणार होता. मात्र त्यापूर्वीच महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा रुपाली चाकणकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भात रुपाली चाकणकर यांच्या नियुक्तीचं गॅझेट नुकतच प्रसिद्ध देखील करण्यात आलं आहे.
काल राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी सात आमदारांचा काल शपथविधी देखील पार पडला आहे. तसेच गेल्या कित्येक दिवसांपासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विधानपरिषदेची आमदारकी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यांच्या नावाला पक्षातूनच विरोध झाला आहे. एकाच व्यक्तीला आपण सगळी पदं देणार का असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी विचारला होता.
Rupali Chakankar l महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ किती असतो? :
मात्र राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या यादीमध्ये रुपाली चाकणकर यांचं नाव नव्हते. त्यानंतर पक्षाने त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा मोठा निर्णयघेतला. त्यामुळे आता महिला आयोगाचं हे पद अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत येणारं राज्य महिला आयोग हे एक मंडळ आहे. तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा असतो. याशिवाय महिला आयोगाच्या अध्यक्षाची आणि सदस्यांची निवड ही राज्य सरकारकडून होत असते.
News Title : Rupali Chakankar again as the Chairperson of the Commission for Women
महत्वाच्या बातम्या-
आज राज्यातील ‘या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता!
संतापजनक! ठाण्यात बदलापूरची पुनरावृत्ती, नराधम निघाला ‘या’ पक्षाचा पदाधिकारी
कोजागिरी पौर्णिमेला 3 राशींचं भाग्य उजळणार, नोकरी ते विवाहातील सर्व अडथळे दूर होणार!
आज कोजागिरी पौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी!
आज कोजागिरी पौर्णिमा, 12 पैकी ‘या’ राशींना होणार धनलाभ!