पुणे | राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ आणि समता परिषदेच्या असंख्य कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे.
समता परिषदेच्या वतीने पुण्यात ओबीसी बचाव मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारवाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार होता.
ओबीसी समाजाच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती. तरीही समता परिषदेच्या नेते तसेच कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी समता परिषदेची मागणी आहे. त्यासाठीच हा मोर्चा काढण्यात येणार होता.
थोडक्यात बातम्या-
“दिल्लीतील भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा काटा काढला”
रजनीकांत अखेर राजकारणात, ‘या’ दिवशी करणार पक्षाची घोषणा!
दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची होणार कोरोना चाचणी
कृषी कायद्याविरुद्ध प्रकाश सिंह बादल आक्रमक, ‘पद्म भूषण’ पुरस्कार परत करणार
टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूच्या कुटुंबियांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा