रूपाली चाकणकरांवर अश्लील शेरेबाजी करणाऱ्या मुंडे समर्थकांवर गुन्हा दाखल!

पुणे | पुणे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर अश्लील शेरेबाजी करणाऱ्या पंकजा मुंडे समर्थकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चाकणकर यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली होती.

बीडमध्ये राष्ट्रवादीची सभा झाल्यानंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली होती. त्यावर ‘ताई थोडं पाणी प्या, चिक्की खा… बरं वाटेल, अशी कमेंट रुपाली चाकणकर यांनी केली होती. चाकणकर यांच्या या कमेंटमुळे मुंडे समर्थकांनी त्यांना ट्रोल केलं होतं. 

दरम्यान, याप्रकरणी मला व कुटुंबास मानसिक त्रास झाला आहे, अशी फिर्याद रूपाली चाकणकर यांनी पोलिसांकडे दिली होती. त्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-पुण्यातील मुठा कालवा तिथं राहणाऱ्या लोकांमुळेच फुटला!

-पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी!

-काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसच्या प्रभारी नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश!

-शबरीमला मंदिरात येणाऱ्या महिलांचे दोन तुकडे करा!

-…म्हणून मराठा आरक्षणासाठी मी राजीनामा देणार नाही-नितेश राणे