पुणे | हिंगणघाट पीडितेसंदर्भात आंदोलन करताना भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि पदाधिकारी चक्क हास्यविनोद करतानाचा फोटो व्हायरल व्हायरल झाला होता. यामुळे संताप व्यक्त केला जात असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भाजपला चांगलेच सुनावलं आहे.
संवेदनहीन भाजपचे हे पुण्याचे शहराध्यक्ष आणि कार्यकर्ते …थोडी तरी जनाची नाही तर मनाची वाटू द्या, आपण काय करतोय. संपूर्ण महाराष्ट्र हिंगणघाटच्या घटनेवर हळहळ व्यक्त करतोय आणि तुम्ही यातही राजकारण करताय. हसत श्रद्धांजली वाहताय. यातच तुमच्या पक्षाचे संस्कार दिसून येतात, असं म्हणत चाकणकर यांनी टीका केली आहे.
हिंगणघाट पीडितेसंदर्भात भाजपने मंगळवारी पुण्यात आंदोलन केले. इतक्या गंभीर घटनेवर आंदोलन करत असताना भाजप नेत्यांकडून हास्यविनोद झालेला पाहायला मिळाला. यामुळे राजकीय वातावरण तापले असून संबंधितांनी जनतेची माफी मागावी, असं चाकणकर म्हणाल्या आहेत.
दरम्यान, हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील तरुणीचा सात दिवसांनी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असून आरोपीला तात्काळ शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.
संवेदनहीन भाजपचे हे पुण्याचे शहराध्यक्ष आणि कार्यकर्ते …थोडी तरी जनाची नाही तर मनाची वाटूद्या आपण काय करतोय.संपूर्ण महाराष्ट्र हिंगणघाटच्या घटनेवर हळहळ व्यक्त करतोय आणि तुम्ही यातही राजकारण करताय हसत श्रद्धांजली वाहताय यातच तुमच्या पक्षाचे संस्कार दिसून येतात. pic.twitter.com/dOUaGwb6nP
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 11, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
भाजपसमोर आता नवं आव्हान; केजरीवाल मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत?
दिल्लीत भाजपचा दारूण पराभव, ट्विट करून मोदी म्हणाले…
महत्वाच्या बातम्या-
‘आप’मतलब्यांचा पराभव झाला; ‘सामना’तून भाजपवर टीकास्त्र
“आता असा राजा आहे ज्याच्याकडे राजधानीच नाही”
Comments are closed.