पुणे | इतकी लपवा-छपवी लहान मुले पण नाही खेळत, जितके मोदी सरकार खेळत आहेत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतभेटीच्या पार्श्वभूमीवर चाकणकर यांनी ही टीका केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प भारतभेटीला आल्यानंतर अहमदाबाद शहराला भेट देणार आहेत. यावेळी पाहुण्यांना रस्त्यावरील झोपडपट्टी दिसू नये यासाठी भिंत बांधली जात आहे. हा मुद्दा पकडून चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
बेरोजगारी लपवा-छपवी, जीडीपी लपवा-छपवी, गरीबी लपवा-छपवी, कमी विक्रीचे आकडे लपवा-छपवी, इतकी लपवा-छपवी लहान मुलंही करत नाहीत, असं म्हणत चाकणकर यांनी टीका केली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
दरम्यान, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारीला भारत भेटीवर येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
इतकी लपवा-छपवी लहान मुले पण नाही खेळत,जितके मोदी सरकार खेळत आहेत.
– बेरोजगारी लपवा-छपवी
– जीडीपी लपवा-छपवी
– गरीबी लपवा-छपवी
– कमी विक्रीचे आकडे लपवा-छपवी
.
.
To be continued…#Modiwall #ModiTrumpSummit— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 20, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
आम्ही १५ कोटी मात्र १०० कोटींना भारी; MIMच्या नेत्यानं गरळ ओकली
दगडाला उत्तर दगडानं, तलवारीला उत्तर तलवारीनं; वारिस पठाणांना ‘मनसे’ इशारा
महत्वाच्या बातम्या-
शिवजयंती साजरी न करणाऱ्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यावर कारवाईची ‘शिवसंग्राम’कडून मागणी
ओवैंसींसमोरच तरुणीच्या ‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद’च्या घोषणा!
मी तसं वक्तव्यच केलं नाही; इंदोरीकर महाराजांची कोलांटीउडी
Comments are closed.