Top News महाराष्ट्र मुंबई

ज्ञानदा काय तुमच्या घरात कामाला आहे काय रे… ट्रोलर्सचा चाकणकरांनी घेतला यथेच्छ समाचार

Loading...

मुंबई |  एबीपी माझाच्या लोकप्रिय वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांच्या नावाने गेले काही दिवस सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. ‘काय सांगशील ज्ञानदा’ असा हॅशटॅग वापरून लोक विविध प्रश्न विचारत आहेत. हलक्या फुलक्या प्रश्नांपासून आता लोक मनाला वाटेल ते प्रश्न विचारत आहेत. यावरच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

गेल्या दोन चार दिवसांपासून ज्ञानदा कदम यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. कोणतंही वाक्य लिहायचं आणि #काय_सांगशील_ज्ञानदा असं म्हणायंच… ज्ञानदा तुमच्या घरात काम करते का? ज्ञानदा तुमच्याकडे कामाला आहे का?, अशा शब्दात चाकणकर यांनी ज्ञानदा कदम यांना ट्रोल करणाऱ्यांचा यथेच्छ समाचार घेतला आहे.

Loading...

एक वृत्तनिवेदिका म्हणून तिचा हा सगळा प्रवास आहे. त्यासाठी तिने शंभरदा अभ्यास केलाय. मुळात तिला नेमकं का ट्रोल केलं जातंय? तिचं काय चुकलंय?आणि शेवटी चुका या माणसाकडूनच होत असतात. समाज शिकला पण समाज सुशिक्षित झाला नाही? अशी खंत चाकणकर यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

आम्ही देखील राजकारणात याचा अनुभव सातत्याने घेत असतो. ज्ञानदावर टीका करणाऱ्यांच्या घरात आई असेल, बहीण असेल त्यांना तिच्या जागेवर ठेऊन पाहा ना, असा सल्ला त्यांनी टीकाकारांना दिला आहे. आपल्या आई आणि बहीणीवर एकदा टीका करून किंवा ट्रेंड करून बघा ना कसा आपल्यामधला शूर पुरूष जागा होता. आपल्या तळपायाची आग मस्तकात जाते. ज्ञानदा ही पण कुणाच्या तरी घरातली आई आहे कुणाची बहीण आहे. असं चाकणकर म्हणाल्या.

कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय क्षेत्रात महिला आपल्या कतृत्वाने पुढे आहेत, हे समाजाला पचत नाही का? समाजाचं दुखणं काय आहे, याचाच मला प्रश्न पडतो.  ज्ञानदाला ट्रोल करणाऱ्यांनी व्यवस्थित स्वत:ची मानसिकता समजून घ्यावी आणि गांभीर्याने विचार करावा, असं म्हणत ज्ञानदाच्या मी सोबत आहे, असं चाकणकर यांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे ज्ञानदा कदम यांच्यावर ट्रेंड करण्यासाठी फेसबुकवर एक पेज उघडण्यात आलं होते. त्या पेजवर गेल्या दोन चार दिवसांपासून मनसोक्तपणे #काय_सांगशील_ज्ञानदाच्या नावाने मनसोक्तपणे ट्रेंड चालवण्यात आला. पण आज या पेजवरून आम्हाला कुणालाही दुखावण्याचा प्रश्न नव्हता. ज्ञानदा ताई या महाराष्ट्राच्या लाडक्या आहेत. त्यांचा संघर्ष आम्हाला माहिती आहे. त्यांच्या पुढील प्रवासासाठी प्रेरणा म्हणून यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केल्याची पोस्ट आज पेजवर टाकण्यात आली आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

“लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी समजला का? जयंतरावांनी मोदींवर केलेली टीका योग्यच”

सॉरी उद्धवजी… मला तुमची माफी मागायचीय; मुख्यमंत्र्यांकडे अभिनेत्याचा माफीनामा

महत्वाच्या बातम्या-

मशिदीत नमाजाला जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना नवाब मलिकांची कळकळीची विनंती; म्हणतात…

राष्ट्रवादीचे सर्व आमदार खासदार एक महिन्याचा पगार सहाय्यता निधीला देणार

जिंदादिल बच्चू कडूंनी ओळखली सामाजिक जबाबदारी; एक महिन्याचा पगार देणार कोरोनाच्या लढाईसाठी

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या