बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर आधी स्वत: खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा- रुपाली चाकणकर

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बवरून लोकसभेतही शिवसेना-भाजप आमने सामने आले. सिंग यांचे आरोप गंभीर असून महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी भाजपने केली. तसेच खासदार नवनीत राण यांनीही लोकसभेत या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतल्याचं पहायला मिळालं.

जो व्यक्ती सोळा वर्ष निलंबित होता. त्याला पुन्हा सेवेत का घेतलं? कुणी घेतलं?, याची चौकशी करण्यात यावी. तसेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी यावेळी केली. यावरून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

नवनीत राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा, अशी बोचरी टीका रूपाली चाकणकर यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात एक फेसबूक पोस्ट केली आहे.

आज तुम्ही खासदार म्हणून जी भूमिका संसदेत मांडली आहे ती खासदारकी तुम्हाला राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेली आहे म्हणून मांडता आली आहे, अशा शब्दात रूपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांचा समाचार घेतला आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत आहे’; रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

नवनीत राणांचा अरविंद सावंतांवर लोकसभेत गंभीर आरोप, म्हणाल्या…

दिल्लीत दारू पिण्यासाठीची वयोमर्यादा घटवली; दिल्ली सरकारची नव्या उत्पादन शुल्क धोरणाची घोषणा

‘लेटरबाॅम्ब’ प्रकरणाला वेगळं वळण; “IPS रश्मी शुक्ला यांना देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती”- परमबीर सिंह

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; कंगणा रनौतचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने सन्मान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More