बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपसारख्या नीचपणाच्या, असंस्कृत चिखलात अशीच कमळं उगवणार”

मुंबई | भाजपचे आमदार सुनील कांबळे यांची पुणे महापालिकेतील एका महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. त्यावरुन, रुपाली चाकणकर यांनी भाजप आणि आमदार सुनिल कांबळेवर निशाणा साधला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

आमदार सुनील कांबळे ही व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती आहे. महिलांना सातत्याने कमी लेखणे, पदोपदी महिलांचा अवमान करणे ही भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती असून महिला अधिकाऱ्यास शिवीगाळ करणारे आमदार सुनील कांबळे हे केवळ त्या प्रवृत्तीचे एक उदाहरण आहे, अशी टीका चाकणकरांनी केलीये.

सुनिल कांबळेंनी संबंधित महिला कर्मचाऱ्याची जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणीही रुपाली चाकणकर यांनी केली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने रस्त्यावर उतरुन सुनिल कांबळे यांचा निषेध नोंदवला आहे. भाजपसारख्या नीचपणाच्या असंस्कृत चिखलात अशीच कमळं उगवणार’, असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी भाजपवर बोचरी टीका केलीये.

दरम्यान, सुनिल कांबळे यांनी पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला शिविगाळ करत धमकी दिल्याची त्यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. महिला अधिकाऱ्यासोबत संभाषणची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आमदार सुनील कांबळे यांनी ती जुनी असल्याची कबुली दिली.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

पुण्यातील भाजप आमदाराचा प्रताप; महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

भायखळा तुरुंगात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव; ‘इतक्या’ जणांना कोरोनाची लागण

…म्हणून स्नेहा दुबे यांनी न्यूज अॅंकर अंजना कश्यपला बाहेरचा रस्ता दाखवला!

‘नरेंद्र मोदी माझ्यावर जळतात’; ममता बॅनर्जी संतापल्या

“संज्या ते पवार कुटुंब आहे, शुभेच्छा ही देतील आणि पाठीमागे तिरडी सुद्धा बांधतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More