महाराष्ट्र मुंबई

“देवेंद्र फडणवीस आपला ‘गजणी’ झालेला दिसतोय”

Loading...

मुंबई | भाजपने महिला अत्याचाराविरोधात घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे विधानसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब झालं. महिला अत्याचाराविरोधात सरकार ठोस पावलं उचलतं नाही तोपर्यंत आमचा पवित्रा कायम राहील, असा इशाराही फडणवीसांनी दिला. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी माजी मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले आहे.

माजी मुख्यमंत्री व गृहमंत्री, सध्याचे विरोधी पक्षनेते कदाचित आपला गजणी झालेला दिसतोय. आपल्याच काळात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात दुसरं, अशी ओळख निर्माण झाली, असं म्हणत रूपाली चाकणकर यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय.

Loading...

2016 ते 2018 या काळात 31, 126 महिला अत्याचाराच्या घटना घडल्या हे आपण विसरू नका. तुमच्या काळात महिला अत्याचार प्रतिबंध कठोर कायदे केले नाहीत. याच आपल्या कर्माचे फळ आज महाराष्ट्र भोगतोय, अशी टीका चाकणकर यांनी केली आहे.

दरम्यान, आजचं आंदोलन हे तुमच्या अपयशाचा आरसा आहे. चोराच्या उलट्या बोंबा…..हे तंतोतंत आपण पालन करत आहात, असा टोलाही चाकणकर यांनी फडणवीसांना लगावला आहे.

 

 

 

ट्रेंडिंग बातम्या- 

“आता सुप्रिया ताईंना ‘सेल्फी विथ खड्डे’चा विसर पडला आहे का?”

अजित पवारांनी आपला ‘तो’ शब्द खरा करुन दाखवला!

महत्वाच्या बातम्या- 

देशाला अस्वस्थ करणारी ही दृश्यं तुम्ही पाहिली का?

“भाजपला पाहून जुने दिवस आठवले, आमचेही घसे असेच कोरडे पडायचे”

‘मलंग’ चित्रपटामुळे वाढली दिशा-आदित्यची लोकप्रियता

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या