Loading...

“सदा खोत हिशोबात रहायचं, झाकली मूठ उघडली तर जड जाईल”

मुंबई | शरद पवारांनी येरवड्याच्या तुरूंगात गांधींच्या शेजारची खोली घेऊन तिथंच रहावं, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

सदा खोत, हिशोबात रहायचं….कारण झाकली मुठ सव्वा लाखाची. उघडली तर जड जाईल, असं म्हणत रूपाली चाकणकर यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीकास्त्र सोडलं. रूपाली चाकणकर यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

Loading...

तुरुंगात गेल्यानंतर आघाडीच्या काळात आमच्यावर गुन्हे करणाऱ्या पवारांना आमचं दुःख काय असतं हे कळेल, असं खोत म्हणाले होते. यावर प्रत्युत्तर देत सदा खोत, तुम्हाला खरं तर उत्तर द्यावं इतकी तुमची औकाद नाही, अशा शब्दात चाकणकर यांनी खोत यांच्यावर तोफ डागली आहे.

दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या- 

 

Loading...

 

 

Loading...