बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अरे भाई हिप्पोक्रसी की भी सीमा होती है !!”

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द केलं आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण संपुष्टात आलं आहे. ओबीसी समाजाच्या हक्कांचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी भाजपकडून शनिवारी राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे.

1990 साली मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर देशभरात OBC आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला होता आणि योगायोग असा की त्यानंतर मंडल विरूद्ध कमंडल हा वाद कुणी चालू केला हे समस्त देशाला ठाऊक आहे, असा टोला रूपाली चाकणकर यांनी भाजपला लगावला आहे. त्या काळी OBC आरक्षणाला विरोध करणारे लोक आज OBC समाजाचा खोटा कळवळा आणून महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करत आहेत. अरे भाई हिप्पोक्रसी की भी सीमा होती है !, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

नव्वदीच्या दशकात देशाच्या राजकारणात मोठे बदल झाले होते. याच दशकात काँग्रेस घराण्याव्यतिरिक्त अन्य सरकारे सत्तेत येऊ लागली. या काळात नवीन ओबीसी नेत्यांचा उदय झाला. लालू यादव, कल्याण सिंग, छगन भुजबळ, मुलायमसिंग यादव यांच्यासारखे नेते सत्तेच्या केंद्रस्थानी आले होते. या काळात मंडल आयोग नेमला गेला होता. 1990 साली मंडल आयोगाने मांडलेल्या शिफारसीवर भाजपने विरोध केला होता. त्यावरूनच  रुपाली चाकणकर यांनी भाजपवर टीका केली आहे.

दरम्यान, मंडल आयोग आल्यानंतर भाजपने त्याला विरोध केला ही सत्य परिस्थिती आहे. आजच्या घडीला मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल काही लोकांना ते स्वतः कोर्टात पाठवतात, तर कोर्टात एखादा निर्णय रद्द झाल्यावर राज्य सरकारच्या विरोधात वेगळी भाषा बोलायला लागतात, अशी टीका नवाब मलिक यांनी याआधी केली होती.

थोडक्यात  बातम्या-

मोठी बातमी! अनिल देशमुखांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स

विमानतळ नामकरण आंदोलन भोवलं; नियमांचं उल्लंघन केल्यामुळे 20 हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल

“…अन्यथा येत्या आधिवेशात विधानसभेला घेराव घालू”

दिल्लीत तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा झालीच नाही, पण… – शरद पवार

“देवेंद्र फडणवीस माझे गॉडफादर, राजीनामा दिला तरी मी भाजपतच राहणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More