बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल; उस्मानाबादमधील ‘त्या’ घटनेवरून चाकणकर कडाडल्या

मुंबई |  उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर याठिकाणी एक गरीब कुटूंबातील मुलीचा बालविवाह पार पाडल्यानंतर तिचा बाळंतपणामध्येच मृत्यू झाला आहे. ही घटना ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी समाज माध्यमावरून उजेडात आणली होती. या घटनेसंदर्भात हेरंब कुलकर्णी यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर रूपाली चाकणकर यांनी या घटनेवर प्रतिक्रीया दिली आहे.

अणदूर या ठिकाणी झालेल्या दुर्दैवी घटनेबाबत मी सरांना आणि सर्वांना सांगू इच्छिते की, संबंधित सर्व प्रशासकिय अधिकारी, पोलीस प्रशासनाशी माझं बोलणं झालं आहे. तात्काळ योग्य ती कारवाई करण्याबाबत त्यांना तशा सूचना देखील दिल्या आहेतच. त्याचबरोबर येत्या 2 ते 3 दिवसांत मी स्वत: त्याठिकाणी येऊन पाहणी करणार असल्याचं रूपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे.

संपूर्ण देशात आज महाराष्ट्राची ओळख ही सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अग्रेसर राज्य म्हणून आहे. परंतु बालविवाह मातामृत्यू, बालमृत्यू या गोष्टींमुळे आपण थोडं मागे पडत आहोत का? याचा विचार आपण आज सर्वांनी करणं महत्वाचं आहे, असं रूपाली चाकणकर यांनी या संदर्भात फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, जो पर्यंत या समस्येच्या मुळापर्यंत जाऊन आपण ती उखडून फेकत नाही, तोपर्यंत या गोष्टी घडतच राहणार. त्यामुळे त्या मुलीच्या मृत्यूकडे एक दुर्दैवी घटना म्हणून न बघता तिच्याकडे एक सामाजिक दृष्टीकोनाकडून बघितलं पाहिजे. राज्य महिला आयोग या घटनेबाबत अत्यंत गंभीर असून याबाबतीत लवकरच योग्य ती कारवाई होईल. त्याचबरोबर सर्वांनी एकत्र घेऊन याबाबत कृतिकार्यक्रम आणि ठोस उपाययोजना राज्य महिला आयोग करेल, असंही चाकणकर म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या- 

आर्यन खान प्रकरणात खळबळ माजवणारा तो व्हिडीओ संजय राऊतांकडून शेअर

दुबईही झाली मालामाल! भारत-पाक सामन्यासाठी तब्बल ‘इतका’ तिकीट दर

शरद पवार महापालिका निवडणुकीच्या रिंगणात, दिवाळीनंतर राजकीय समीकरण बदलणार?

आर्यन खान प्रकरणाला नवं वळण, एनसीबी पंचानेच केले समीर वानखेडेंवर गंभीर आरोप

माही ‘हा’ सामना नको जिंकू म्हणणाऱ्या पाकिस्तानच्या तरूणीला धोनीचं भन्नाट उत्तर, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More