बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रंगलेल्या गालाचा ‘मुका’ घेण्याचं वक्तव्य दरेकरांना भोवणार?; चाकणकरांची दरेकरांविरोधात पोलिसात तक्रार

मुंबई | काही दिवसांपुर्वीच लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी असभ्य भाषेत टीका केली होती. यावेळी राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यामुळे आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आक्रमक झाल्या आहेत.

प्रविण दरेकरांनी केलेल्या टीकेमुळे रुपाली यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात रुपाली चाकणकरांनी दरेकरांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट देखील केलं आहे.

केलेल्या ट्विटमध्ये दरेकरांनी जनाची नाही तर मनाची लाज ठेवून महिलांची माफी मागावी, असं चाकणकरांनी म्हटलं आहे. तसेच कायद्याच्या चौकटीत राहून आम्हा महिलांना न्याय मिळेल या उद्देशाने आपण तक्रार नोंदवल्याचं रुपाली यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, सुरेखा पुणेकरांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर पुण्यात पुणेकरांच्या प्रवेशाचा अप्रत्यक्ष संदर्भ देत दरेकरांनी टीका केली होती. यावरुन दरेकरांनी माफी मागावी अशी भूमिका घेत दरेकर यांच्या बोलण्यातून त्यांच्या पक्षाची संस्कृती दिसून येत असल्याचं रुपाली चाकणकरांनी म्हटलं आहे.

पाहा ट्विटः

थोडक्यात बातम्या-

“मी पाटलांवर सव्वा रुपयांचा दावा ठोकणार, कारण त्यांची लायकी कोट्यावधींची नाही”

‘चंद्रकांत पाटलांच्या लेखणीला फेस…’; पाटलांनी अग्रलेखाला दिलेलं उत्तर राऊतांनी जसंच्या तसं छापलं!

“मुख्यमंत्र्यांच्या पत्राची होळी करणाऱ्यांची कीव येते”

RBI ने लागू केले ‘हे’ नवीन नियम; 1 ऑक्टोबरपासून डिजिटल पेमेंटमध्ये होणार हा मोठा बदल

नितीन गडकरी ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More