पुणे महाराष्ट्र

चित्राताईंनी पक्ष सोडल्यानं प्रदेशाध्यक्षपद मिळालं त्यांचे आभार मानाल का?, चाकणकर म्हणतात…

पुणे | चित्राताई अचानक पक्ष सोडून गेल्यावर प्रदेशाध्यक्षा म्हणून तुमची निवड झाली याबद्दल तुम्ही चित्राताईंचे आभार मानले का? जर मानले नसतील तर आज #AskRupaliTai च्या निमित्ताने मानाल का?, असा प्रश्न राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विचारण्यात आला होता.

#AskRupaliTai या उपक्रमांतर्गत @BeingShrutip या ट्विटर हँडलवरुन हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला रुपाली चाकणकर यांनी स्वतःच्या अंदाजात उत्तर दिलं आहे.

आपल्या घरातील “पिता”अडचणीत असताना आपण घर सोडून जात नाही, तर घरातील सर्व सदस्य एकञ येत अडचणीतुन बाहेर पडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो.ज्याला लहानाचं मोठं केलं त्यांनी किमान उपकाराची जाणीव ठेवायला हवी होती…….आपण सांगाव, आभार कशासाठी मानायचे??, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

तसेच प्रदेशाध्यक्षपद आपल्यालाच का मिळालं याविषयी त्यांनी भाष्य केलं आहे. राहिला विषय माझा, मी आणि माझे कुटुंब गेली पंधरा वर्षेपेक्षा अधिक काळ पक्षासाठीच काम करतोय, असं त्या म्हणाल्या आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

खडकवासल्यातून मलाच उमेदवारी मिळणार होती, मात्र… रुपाली चाकणकरांचा मोठा खुलासा

गुडन्यूज! पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट, आज सापडले फक्त एवढे रुग्ण

महत्वाच्या बातम्या-

आम्हाला सलून उघडायला परवानगी द्या, नाहीतर….; सलून व्यावसायिक आक्रमक

पक्षाला मिळालेल्या यशात आमचा थोडा तरी वाटा असेल ना?; सत्यजित तांबेंचं कार्यकर्त्यांची खदखद मांडणार पत्र

“मुंबई-महाराष्ट्रात बेड्सची पुरेशी संख्या, कोरोनाचा सामना करण्यास ठाकरे सरकार खंबीर”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या