रुपाली चाकणकरांनी धाडली नोटीस, संभाजी भिडेंनी केली ‘ही’ विनंती

मुंबई | महिला पत्रकाराला “आधी टिकली लाव मगच तुझ्याशी बोलतो”, असं म्हणणं श्रीशिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यासंदर्भात स्वतः यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे.

या प्रकरणात राज्य महिला आयोगाने संभाजी भिडे यांना नोटीस बजावली होती. या नोटीसला भिडे यांनी अद्याप उत्तर दिलेलं नाही, पण एक विनंती मात्र त्यांनी महिला आयोगाला केली आहे.

काय आहे संभाजी भिडे यांची विनंती?

आयोगाने पाठवलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी मला १० दिवसांचा अवधी मिळावा, असा विनंती अर्ज संभाजी भिडे यांनी कार्यालयाकडे केला आहे. रुपाली चाकणकर यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता १० दिवसांनंतर भिडे या नोटीसला काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.