इंदुरीकर महाराजांसंदर्भात कोर्टाचा अत्यंत महत्त्वाचा निकाल!

अहमदनगर | प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनामुळे कायम चर्चेत असतात. त्यांच्या कार्यक्रमात पुरुषांसोबत महिलावर्गाची सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. या शिवाय तरुणांपासून ते वयोवृद्ध लोक देखील त्यांच्या कार्यक्रमात गर्दी करत असतात.

दरम्यान इंदुरीकर महाराज यांच्यावर एक संकट कोसळलं होतं. कीर्तनात बोलत असताना त्यांनी असं काही वक्तव्य केलेलं ज्यामुळे त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आता इंदुरीकर महाराजांसाठी दिलसादायक बातमी समोर आली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

2020 मध्ये इंदुरीकरांनी आपल्या कीर्तनात पुत्र प्राप्तीबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणी कोर्टात धाव घेतली होती.

सुरुवातीला इंदुरीकर महाराजांना स्थानिक कनिष्ठ कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला होता. कोर्टाने इंदुरीकर महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान आता इंदुरीकर महाराजांना कोर्टाने दिलासा दिला आहे.

विशेष म्हणजे इंदुरीकर महाराज सुनावणीच्या एक दिवस आधीच स्वतः कोर्टात हजर राहीले आणि त्यांनी जामीन मिळवला. या प्रकरणावर 24 नोव्हेंबरला सुनावणी होईल, असं जाहीर करण्यात आलं होतं.

मात्र, इंदुरीकर महाराजांनी 24 तारखेला इतर जिल्ह्यात नियोजित कीर्तन असल्याने कोर्टाला विनंती केली होती. त्यांची ही विनंती कोर्टाने मान्य केली. कोर्टाने इंदुरीकर महाराजांना 20 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

थोडक्यात बातम्या-