पुणे | हिंगणघाट आणि औरंगाबाद येथे घडलेल्या घटनांमुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट आहे. या प्रकरणी दोषी असणाऱ्या आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जसा गुन्हा तशी शिक्षा व्हावी, असं मत व्यक्त केलं आहे.
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी समाजाचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. तसेच लवकर न्याय मिळण्यासाठी तात्काळ खटला चालावा. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी त्वरीत व्हावी. Fast Track न्यायालयात त्वरीत निर्णय व्हावा, असं चाकणकर म्हणाल्या आहेत.
चाकणकर यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जगण्याचा, वावरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जसा गुन्हा तशी शिक्षा व्हावी, अशी मागणी चाकणकरांनी केली आहे.
दरम्यान, हिंगणघाट येथील पीडित तरुणी मृत्यूशी झुंज देत आहे. तर औरंगाबादमधील महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई व्हाही, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“बच्चू कडू…तुमच्यासारखा वाघ शेंबड्या ठाकरे सरकारमध्ये शोभत नाही”
हिंदूंसाठी धर्म आस्थेचा विषय, तर संघासाठी धर्म म्हणजे धंदा- कन्हैया कुमार
महत्वाच्या बातम्या-
हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला ‘हैदराबाद’सारखी शिक्षा द्या- प्रणिती शिंदे
आपल्यातील भांडणं विसरुन कठोर निर्णय घ्या; अमृता फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
काँग्रेसची बेरोजगारी कधीच संपू देणार नाही- पंतप्रधान मोदी
Comments are closed.