बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘देवेंद्र फडणवीसांना अटक करा’; रुपाली चाकणकरांची मागणी

मुंबई | मुंबई पोलिसांनी ब्रूक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतल्याचं कळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली होती. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना अटक करा, अशी मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे

रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा केल्याचा संशय असलेल्या ब्रूक फार्माच्या मालकाच्या पोलीस चौकशीवर आक्षेप घेणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करा, असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

रूपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना अटक करा, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता गृहमंत्री यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मणच्या ब्रूक फार्मा या कंपनीकडे तब्बल 60 हजार रेमडेसिव्हीरचा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. विशेष गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्यातील भाजपच्या नेत्यांनी याच कंपनीत जाऊन महाराष्ट्रासाठी काही इंजेक्शन्स बूक केली होती. मात्र शनिवारी मुंबई पोलिसांनी अचानक ब्रूक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतलं. यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

थोडक्यात बातम्या- 

पुण्यात नग्न अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ

“बनावट रेमडेसिवीर प्रकरणात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता”; भाजप आमदाराच्या ट्विटनं खळबळ

‘तो दारु पिऊन दिवसभर वावरात पडलेला असतो’; भाजपच्या ‘या’ आमदारावर गायकवाडांची टीका

घरातून येत होता कुजलेला वास, दरवाजा तोडताच समोर दिसला धक्कादायक प्रकार

“अरे ओ बेटा जी…”; ….म्हणून सेहवागनं प्रिती झिंटाला केलं ट्रोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More