…तर एवढ्या दिवस ते गप्प का बसले?- रूपाली चाकणकर
मुंबई | परमीबर सिंह यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बवरुन महाराष्ट्रातील राजकाण ढवळून निघालं आहे. सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या पत्रात अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंह यांनी केलाय.
परमीबर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर विरोधकांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी करत ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.
परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना स्वतःच्या अखत्यारीत निर्णय घेऊन पुन्हा सेवेत रुजू करून घेतलं होतं. 100 कोटी रुपयांची मागणी जर फेब्रुवारीमध्ये झाली आहे, असं पत्रात त्यांनी म्हटलं आहे, तर एवढ्या दिवस ते गप्प का बसले?, असा सवाल करत याचीही चौकशी केली जावी, असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून असे मिळून शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, असं या पत्रात म्हटलं आहे. प्रत्येक महिन्याला ही वसूली करण्याचं वाझेंना टार्गेट देण्यात आलं होतं, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. तसेच भारताचा खरा नागरिक म्हणून मी मागील 32 वर्षे पोलीस अधिकारी म्हणून घेतलेल्या शपथेला जागलो आहे. मी खाली नमूद केलेल्या मुद्द्यांची आपण दखल घ्यावी ही विनंती. तसेच तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदाच्या संवैधानिक जबाबदाऱ्यांच्या पाठिशी उभे राहा, असंही परमबीर सिंह यांनी पत्रात म्हटलं आहे.
परमबीर सिंग यांनी सचिन वाझे यांना स्वतःच्या अखत्यारीत निर्णय घेऊन पुन्हा सेवेत रुजू करून घेतले होते , 100 कोटी रुपयांची मागणी जर फेब्रुवारीमध्ये झाली आहे, असं पत्रात त्यांनी म्हटलं आहे, तर एवढ्या दिवस ते गप्प का बसले??@CMOMaharashtra याचीही चौकशी व्हावी.#NCP
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 21, 2021
थोडक्यात बातम्या-
“अनिल देशमुख यांच्याआधी उद्धव ठाकरेंचा राजीनामा घ्या, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही”
“महाराष्ट्रात गृहविभाग नेमकं कोण चालवतंय; अनिल परब की अनिल देशमुख?”
“ठाकरे सरकार चोरांचं, खुन्यांचं असून ते बरखास्त करण्यात यावं”
“वाझेला कामावर रुजू करून घेताना सरकार काय झोपलं होतं का?”
“…त्यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी राजीनामा दिला होता का?”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.