बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तापलेल्या तव्यावर स्वत:ची चपाती भाजण्याची सवय भाजपने बदलावी”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं आहे. या पुरस्काराला त्यांनी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद याचं नाव दिलं आहे. खेलरत्न पुरस्कारातून राजीव गांधी यांचं नाव काढल्याने काँग्रेस सरकारवर सडकून टीका केलीये. तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनीबी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

आधीच्या सरकारने केलेल्या कामांची नावे फक्त राजकीय द्वेषातून बदलून त्याचं श्रेय लाटण्याची या सरकारची जुनी खोड आहे. तापलेल्या तव्यावर स्वतःची चपाती भाजण्याची सवय भाजपने आता तरी बदलायला हवी. जनतेच्या आणखीही बऱ्याच मागण्या आहेत त्याकडे देखील प्रधानसेवकांनी लक्ष द्यावं, अशी टीका चाकणकरांनी केलीये.

जनतेची मागणी म्हणून खेलरत्न पुरस्कारांचं नाव बदललं म्हणे, चांगलं आहे. जनतेच्या अजूनही काही छोट्या छोट्या मागण्या आहेत. महागाई कमी करा, युवकांना रोजगार द्या, महिलांना सुरक्षा द्या, शेतकऱ्यांना सन्मान द्या आणि राजीनामा द्या, असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेससह विरोधकांनी मोदींच्या या निर्णयाला विरोध करत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच मोदींना टोला लगावत अहमदाबादच्या नव्या स्टेडिअमला दिलेलं तुमचं नाव हटवून एखाद्या खेळाडूचं नाव तिथं दिलं जावं, अशी मागणी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

लहान मुलांच्या लसीकरणाबाबत आदर पुनावाला यांची मोठी घोषणा, म्हणाले…

“खात्यात 15 लाख आले, युवकांना नोकऱ्या मिळाल्या, भारत विश्व गुरू बनला म्हणूनच मोदी….”

“लहान भाऊ म्हणून चंद्रकांत पाटलांना विनंती आहे की, मानसोपचार तज्ज्ञाला दाखवा”

“मोदींनीही सांगितलंय जान है तो जहान है, त्यामुळे महामारीत राजकारण करू नका”

“दोन पक्ष एकत्र आले तर भाजप मनसे दोघांनाही फायदा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More