बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवनीत राणांची बाजू घेत सरकारवर टीका करणाऱ्या चित्रा वाघ यांना चाकणकरांनी सुनावलं, म्हणाल्या…

मुंबई | महाराष्ट्रातील प्रश्न संसदेत उपस्थित केल्यामुळे अरविंद सावंत यांनी आपल्याला संसदेच्या लॉबीत धमकावल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. यानंतर नवनीत राणांची बाजू घेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अरविंद सावंतांवर हल्लाबोल करत ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. याला प्रत्युत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

महाराष्ट्राचा स्वाभिमान असणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्या नावाचा वापर करून तुम्ही ज्यांना पाठीशी घालत आहात त्यांना एकच प्रश्न विचारा चित्रा वाघ की, तुम्ही गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या हक्काचा GST निधी मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले, असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलंय. त्यांनी या संदर्भात ट्विट केले आहेत.

महाराष्ट्रात राहुन शासनाधिकृत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न करता अनधिकृत अशा PM Care Fund ला मदत केली जे आज हिशोब मागितला तरी द्यायला तयार नाहीत यापेक्षा मोठा महाराष्ट्रद्रोह होऊच शकत नाही, असंही चाकणकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या नवनीत राणा यांचाही चाकणकर यांनी जोरदार समाचार घेतला आहे. नवनीत राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा, अशी बोचरी टीका रूपाली चाकणकर यांनी केली आहे.

 

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

जास्त मद्यपान केल्यामुळे मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम मिळणार का?, सर्वोच्च न्यायालय म्हणालं…

मी शिवसैनिक आहे, आम्ही महिलांना धमकावण्याचं काम करत नाही- अरविंद सावंत

“ए भाई , तू जो कोण असशील…”; भाई जगताप यांच्यावर अमृता फडणवीस भडकल्या

“व्वा रे बहाद्दर…महाराष्ट्र नावावर करून घेतलात की काय?”

“पोलीसांची खाती स्वत:च्या बायकोच्या बँकेत वर्ग केली तेव्हा फडणवीसांनी राजीनामा दिला होता का?”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More