बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”

मुंबई | गेल्या काही दिवसांमध्ये कोरानाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाच्या या लाटेला थोपवण्यासाठी केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. मात्र आता लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण मोहिम मंदावली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा. भारतीय नागरिकांना लसीकरणापासून वंचित ठेवून केंद्र सरकारने जगभरात या लसी फुकट वाटल्या. केंद्र सरकारच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागत आहे. या पापाचं प्रायश्चित्त भाजपला करावंच लागेल, असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

याआधी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनीही केंद्रावर निशाणा साधला होता.दाओसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही लसगुरु बनल्याचे जाहीर केले होते. यूएनमधील भारतीय दुतावासाने सांगितले की, जितके लसीकरण भारतात झाले नाही त्यापेक्षा जास्त लस विदेशात पाठवण्यात आली आहे. आता केंद्रसरकार मात्र एक कोटी पाठविल्याचे सांगत आहे. तर काहीजण पाच कोटी कंपल्सरी पाठवायच्या होत्या म्हणून पाठवल्याचं बोलत असल्याचं मलिक यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, मोदीजी, आमच्या मुलांच्या हक्काची लस विदेशात का पाठवली? अशी पोस्टर्स काही लोकांनी लावली आहेत. तर भाजपचे काही लोक लहान मुलांची लस तयारच झाली नसल्याचं बोलत आहेत. सारे भारतीय भारतमातेची लेकरं आहेत. लस विदेशात पाठवली तर प्रश्न लोकं विचारणारच ना?, परंतु केंद्रसरकार प्रश्न विचारणाऱ्या लोकांना गुन्हा दाखल करत अटक करत आहे. संपूर्ण देश प्रश्न विचारतोय… किती लोकांना अटक करणार मोदीजी,  असा सवालही मलिकांनी केला होता.

 

थोडक्यात बातम्या- 

मला सेक्स करायला जाण्यासाठी ई-पास हवाय; तरुणाच्या अर्जाने पोलीस हैराण

‘शरद पवार राज्याचे नेते पण त्यांनी फक्त बारामतीचा विकास केला’; शिवसेना आमदाराची टीका

लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर अनोखी कारवाई; वाचा सविस्तर…

घरात विलगीकरणासाठी जागा नाही; तरूणाने 11 दिवस झाडावर काढले

परदेशात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून सव्वा महिना बलात्कार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More