बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून पाटलांना कोल्हापूर सोडून पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला”

मुंबई | मंगळवेढा- पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा पराभव केला. यावरूवन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला गमावला आहे. पाटलांच्या या टीकेला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

चंद्रकांत पाटील यांना स्वत:च्या गावात ग्रामपंचायत निवडून आणता आली नाही. कोल्हापुरात त्यांना महापौर बसवता आला नाही. या दैदिप्यमान कामगिरीमुळेच तुम्हाला कोल्हापूर सोडून पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांना कोरोनाच्या संकटाशी काहीही देणघेणं नाही. ‘याला महागात पडेल’, ‘त्याला बघून घेऊ’, ‘त्याच्यावर गुन्हा दाखल करा’, ‘त्याला आत टाका’, अशा विषयांवर पीएचडी पूर्ण करुन चंद्रकांतदादा एम फिल करत आहेत, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या.

दरम्यान, चंद्रकांतदादांनी आपल्या आजुबाजूला पाहिले तर भाजपामधील अनेक नेतेही जामिनावरच बाहेर आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी इतरांशी मग्रूरपणे बोलू नये, नाहीतर तुमच्याशिवाय तुमच्या आजूबाजूला असलेल्या इतरांची बोलती बंद होईल, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

“पराभवाची सवय करून घेतली पाहिजे, कारण आता वारंवार फटके बसणारेत”

“धमकी कोण देतंय उघड झालंच पाहिजे, पुनावालांच्या सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस घेईल”

अदर पुनावालांनी मागणी केली नसताना त्यांना सुरक्षा का पुरवली- नाना पटोले

जावई आणि सासू प्रेमसंबंधामुळे आले पळून, मात्र पुढे घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

“अदर पुनावालांना शिवसेनेच्या गुंडांनी लसीसाठी धमकी दिली”; वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More