Top News महाराष्ट्र

भाजप हा बलात्काऱ्यांचा पक्ष असं चित्रा वाघच म्हणाल्या होत्या- रूपाली चाकणकर

उस्मानाबाद | भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. या टीकेला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाल चाकणकर यांनी चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

चित्र वाघ राष्ट्रवादीत असताना भाजपच्या नावाने खडे फोडायच्या. भाजप हा बलात्काऱ्यांचा पक्ष आहे असं त्या जाहीर सभेत बोलल्या होत्या, असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

स्वार्थापोटी चित्रा वाघ भाजपमध्ये गेल्या आहेत. तिकडे गेल्यानंतर इकडच्या लोकांवर टीका करत आहेत. त्यामुळे त्यांनी एकदा आपल्या भूमिकेवर ठाम राहावं की आपल्याला नेमकं काय बोलायचं आहे, असंही चाकणकर म्हणाल्या.

दरम्यान, पूर्वीचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृहखातं होतं तेव्हा त्यांना नागपूरमध्ये ते रहात असलेल्या भागात हायअलर्ट झोन घोषित करावा लागला होता. त्यामुळे दुसऱ्यांवर चिखलफेक करण्यापूर्वी स्वतः नीट अभ्यास करावा, असं म्हणत चाकणकरांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनाही टोला लगावला.

थोडक्यात बातम्या-

…अन् पाणी समजून त्या सरकारी अधिकाऱ्यानं प्यायलं सॅनिटायझर!

…अन्यथा 40 लाख ट्रॅक्टर रस्त्यावर उतरवणार; शेतकरी नेत्याचा मोदींना इशारा

मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, पालिकेच्या शाळा आता ‘या’ नावाने ओळखल्या जाणार

“मी माझी सत्याची बाजू मांडली मात्र तरीही मला धमक्यांचे फोन येतात”

“आम्ही शेतकरी आहोत, गरज पडली तर लाथ मारु तेथे पाणी काढू”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या