बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मीच तो सर्वज्ञ’ फडणवीसांच्या अशा स्वभावामुळे राज्यावर संकट आलं- रूपाली चाकणकर

मुुंबई | राज्यात परतीच्या पावासाने थैमान घातलं आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे त्यासोबतच काढणीला आलेल्या पीक वाहून गेली आहेत. राज्यभर महापूर- ढगफुटी हाहाकार माजवला असताना आता गुलाबी चक्रीवादळाने आणखी भर घातली आहे. अशातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील महत्त्वकांक्षी योजना ‘जलयुक्त शिवार’वरून पर्यावरण अभ्यासकांनी टीका केली होती. याचाच धागा पकडत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

जलयुक्त शिवार योजनेच्या कामात अनेक चुका झाल्या आहेत. कारण या कामावेळी नदीचं रूंदीकरण, खोलीकरण, सरळीकरण करणं हे नैसर्गिक प्रवाहाला कोणताही अडथळा आणणारं होतं, अशी टीका पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केली होती.

देवेंद्र फडणवीस यांच्या ‘दिशाहीन अभ्यासामुळे’ राज्यातील पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे’. या बाबतीत तज्ज्ञांनी अगोदरच सांगितलं सुद्धा होतं मात्र ‘मीच तो सर्वज्ञ’ अशा स्वभावामुळे राज्यातील हे संकट निर्माण झालं आहे. कोणतेही काम करताना आजच्या सोबतच भविष्याचा विचार करणं महत्वपूर्ण असते, असं रूपाली चाकणकर म्हणाल्या.

दरम्यान, मराठवाड्यातील पूरस्थितीच्या कारणांपैकी जलयुक्त शिवार असल्याची टीका ज्येष्ठ जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी केली आहे. यावर देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

“कन्हैया कुमार म्हणजे रंग बदलणारा सरडा, तो भाजपमध्येही जाऊ शकतो”

“कॅप्टन अमरिंदर सिंग यांना केंद्रात मंत्रिमंडळात लॉटरी लागण्याची शक्यता, लवकरच घेणार मोदींची भेट”

“सुप्रिया ताई जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा का?”

आलिया भट्टने केला हिंदू संस्कृतीचा अपमान??? मुंबईत आलियाविरूद्ध तक्रार दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More