बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

असुराचा वध करायला महाराष्ट्रातील रणरागिणी मागे हटणार नाही- रूपाली चाकणकर

मुंबई | शिवसेनेनं बांगड्या घातल्या असतील पण आम्ही नाही अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनादरम्यान शिवसेनेवर केली होती. यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर सणसणीत उत्तर दिलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

बांगड्या हे महिलांचे आभूषण आहे. पौराणिक कथेमध्ये महिषासुर नावाच्या असुराचा वध बांगड्या घातलेल्या देवीने केला होता. हे फडणवीस विसरले असतील. मात्र नकारात्मक विचार असणाऱ्या असुराचा वध करायला महाराष्ट्रातील रणरागिणी मागे हटणार नाही, असं चाकणकर यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीसजी मी सहसा प्रत्युत्तर देत नाही. सर्वात शक्तीशाली महिलांनी बांगड्या परिधान केल्या आहेत. त्यामुळे कृपया तुम्ही बांगड्याबाबतच्या वक्तव्याबाबत माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेचे  मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आता त्यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागतात की नाही?, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

दिल्ली हिंसाचाराबाबत मोदींनी मौन सोडलं; म्हणाले…

‘वेल्हा’ तालुक्यास राजगड नाव द्या- सुप्रिया सुळे

महत्वाच्या बातम्या-

शिवसेनेच्या हिंदुत्वाची परिक्षा!; सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजप आक्रमक

राज्यातील 305 शाळा बंद करण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय

शिवस्मारकाच्या कामामध्ये गैरव्यवहार?; महाविकास आघाडीकडून मोठा खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More