बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदीजी, बंगालमधील पराभवाचा राग पेट्रोल, डिझेलवर का काढताय?- रूपाली चाकणकर

मुंबई | देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये सर्वांचं लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमुल काँग्रेसने आपली सत्ता राखली. या निवडणुका पार पडल्यानंतर  पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

सन्माननीय पंतप्रधान मोदीसाहेब, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?, असा सवाल रूपाली चाकणकर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

दर महिन्याला भारतात निवडणुका असत्या तर किती बरं झालं असतं. काही नाही निदान पेट्रोल डिझेलचे भाव तरी स्थिर राहिले असते. पाच राज्यांच्या निवडणुक निकालापासून आजची सलग चौथ्या दिवशी भाववाढ, असंही रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये पेट्रोलचा भाव 27 पैशांनी वाढून तो 97.61 रुपयांवर पोहोचला आहे तर डिझेलचा भाव 33 पैशांनी वाढून तो 88.82 रुपयांवर पोहोचला आहे. तसेच राजधानी दिल्लीमध्येही पेट्रोलचा भाव 28 पैशांनी वाढून तो 91.27 रुपयांवर पोहोचला आहे तर डिझेलचा भाव 31 पैशांनी वाढून 81.73 रुपयांवर पोहोचला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवणार; ‘हे’ आहे महत्त्वाचं कारण!

“विखेंच्या बोलण्याला फार महत्त्व देत जाऊ नका, ते नैराश्यात आहेत”

“अजितदादा धडाडीचे नेते, उपमुख्यमंत्री झाल्यावर का बदलले?”

‘छोटा राजन जिवंत आहे’; AIIMS च्या अधिकाऱ्यांचा खुलासा

8 महिन्याच्या चिमुकल्याला यकृतदान करून आईनं दिला दुसरा जन्म!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More