बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एकीकडं मोदी महाराष्ट्राचं कौतुक करत आहेत दुसरीकडे दरेकरांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडलं”

मुंबई | कोरोनाने देशभर थैमान घातलं आहे. कोरोनाच्या या प्रादुर्भावापासून जनतेचं संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने 18 वर्षावरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला. मात्र आता लसीचा तुटवडा असल्या कारणाने राज्यात लसीकरण मंदावलं आहे. राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे तर राज्यातील विरोधी पक्षातील नेते राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी विधानपरिषदेेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांवर निशाणा साधला आहे.

एकीकडे मोदीजी महाराष्ट्राचं कौतुक करत आहेत, आज नीती आयोगाच्या अध्यक्षांनी देशभरात यशस्वी ठरत असलेल्या मुंबई मॉडेलचं कौतुक केलं आहे तर दुसरीकडे प्रवीणजी दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं आहे की त्यांना काय आरोप करावे याचं सुद्धा भान राहिलेलं नाही, असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

अशी वक्तव्य करून तुम्ही सन्माननीय पंतप्रधान मोदीजींचा अपमान करताय.नितीनजी गडकरींनी कालच्या एका भाषणात अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. ते भाषण अजून तुमच्यापर्यंत आलेले दिसत नाही, वाटल्यास त्याची लिंक आम्ही तुम्हाला देऊ शकतो, असंही चाकणकर म्हणाल्या. चाकणकरांनी ट्विटमध्ये एक लिंकही शेअक केली आहे.

दरम्यान, प्रविण दरेकर आता रूपाली चाकणकरांच्या टीकेवर काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलीस हवलदाराला जबर मारहाण!

पक्षाला सुधारणांची गरज, निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट- सोनिया गांधी

सेल्फीवरुन पतीसोबत झालं भांडण, पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल

“चंद्रकांतदादांची सगळी ‘माया’ कुठंय हे मला माहिती आहे”

मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात 10 दिवस लॉकडाउन वाढवला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More