बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले”

मुंबई | दोन दिवसीय पावसाळी विधीमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. अधिवेशनात भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. आमदार रवी राणा यांनी शेतकरी मुद्द्यावरुन विधानसभेमध्ये गोंधळ घालत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना तालिका अध्यक्ष असलेल्या भास्कर जाधव यांनी सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश मार्शल्सला दिले होते.

यावरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदर नवनीत राणा यांना टोला हाणला आहे. बायको जात चोरते आणि नवरा राजदंड , हे तर बंटी-बबली निघाले, असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

रूपाली चाकणकर यांनी केलेल्या टीकेवर नवनीत राणा आणि रवी राणा काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, अधिनेशनावेळी, आमदार रवी राणा यांनी दिलेलं निवेदन थेट देता येत नाही. शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चेच्या वेळी आपण सहभाग घ्यावा, असं भास्कर जाधव यांनी सांगितलं. पण हा प्रस्ताव देतानाच त्यांची आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांची बाचाबाची झाली. त्यावेळी रवी राणा यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. मार्शलला बोलावून भास्कर जाधव यांनी रवी राणा यांना बाहेर काढलं होतं.

 

थोडक्यात बातम्या- 

केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनीही दिला मंत्रीपदाचा राजीनामा

“शेतकरी उध्वस्त होत आहेत, जोपर्यंत कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत घरी जाणार नाही”

आज तब्बल एवढे मंत्री घेणार मंत्रिपदाची शपथ; केंद्रीय मंत्र्यांची संख्या जाणार 81 वर 

“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या सुविधांचा उपभोग घ्यायचा आहे, पण जबाबदारीपासून पळ काढायचा आहे

खुशखबर! पुण्यात ‘इतक्या’ रुपयांमध्ये करा एसी बसने प्रवास

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More