पुणे | गेल्या काही दिवसात महाविकास आघाडीतील तीन नेत्यांना ईडीच्या नोटीस आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भाजपवर टीका केली आहे. पुण्यात त्या माध्यमांशी बोलत होत्या.
भाजपच्या नेत्यांना ईडीच्या नोटीस येत नाहीत. ईडीच्या नोटिसा या फक्त राजकीय हेतूनेच प्रेरित होऊन येत असून भाजमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ईडीच्या नोटीसही सोबत येत असल्याचं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांनाही ईडीची नोटीस आली होती. केवळ राजकीय हेतूने आणि आकसापोटी या नोटीसा पाठवल्या जात असल्याचं चाकणकर म्हणाले.
दरम्यान, विशेष म्हणजे भाजपच्या कोणत्याही नेत्याला, पदाधिकाऱ्याला ईडीची नोटीस आली नाही हे सर्वसामान्य लोकांना समजतं. या पाठीमागे किती मोठं राजकारण आहे हे आपण पाहत असल्याचं चाकणकर सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
“कोण रश्मी वहिनी? असं बहुतेक संजय राऊतांचं म्हणणं असावं”
“आता सत्ता महत्त्वाची की मराठी अस्मिता महत्त्वाची हे शिवसेनेने ठरवावं”
‘सरकार तीन पक्षांचं आहे शिवसेनेने विसरून नाही चालणार’; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा शिवसेनेला इशार
रोहित शर्माची एक चूक आणि भारताचे 5 खेळाडू आयसोलेशनमध्ये