पुणे महाराष्ट्र

रूपाली चाकणकर यांचं कार्यालय पेटवून देण्याची धमकी!

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांचे कार्यालय पेटवून देण्याचा धमकीचा फोन आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्यातील धायरी भागात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात एका इसमाचा फोन आला असता चाकणकर यांचे स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी तो उचलला.

फोनवरून मी जयंत रामचंद्र पाटील बोलत असून मला रूपाली चाकणकर यांचा मोबाईल नंबर दे, ती काय करते ते बघतोच तसेच तुला माहिती नाही का मी कोण आहे ते, तुला तुमचे कार्यकर्ते किंवा पोलिस बोलवायचे असतील तर बोलव, मी घाबरत नाही असे म्हणत तुमचे कार्यालय पेटवून देईन अशी धमकी इसमाने फोनवरून दिली.

ज्या कुणी अनोळखी व्यक्तीने फोन करून अशा पद्धतीने भाषा वापरून धमकीचा फोन केला आहे. त्याच्याविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस योग्य तो तपास करतील, न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे, असं चाकणकर म्हणाल्यात.

थोडक्यात बातम्या-

तेजस ठाकरेंची दमदार कामगिरी; चन्ना प्रजातीचा शोध

“राहुल गांधींची मेहनत वाखणण्याजोगी पण कुठेतरी ते कमी पडतायत”

ईडी दाखवली तर आता सीडीही निघणार; अमोल मिटकरींचा इशारा

…आता महाविकास आघाडीची झोप उडवणार- आशिष शेलार

मला अद्याप ईडीची नोटीस मिळालेली नाही, आल्यावर बोलेन- एकनाथ खडसे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या