मुंबई | महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मुंबई प्रदेश कार्यालयात पदभार स्विकारला. शनिवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून चाकणकर यांची नियुक्ती केली होती.
कुणी पक्ष सोडून गेलं म्हणून पक्षाचं काम थांबत नाही. येत्या 2 दिवसांनंतर महाराष्ट्र दौरा करून लोकांचे प्रश्न विचारात घेऊन सरकारला जाब विचारू आणि सरकारविरोधात जोरदार आंदोलन छेडू, असं चाकणकर म्हणाल्या.
चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने चाकणकर यांची या पदावर वर्णी लागली आहे.
दरम्यान, याआधी रूपाली चाकणकर पुणे शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा होत्या. गेल्या महिन्यातच त्यांचं हे पद काढून घेण्यात आलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
–संसदेत दुष्काळावर भाषण अन् विजयी रॅलीत हजारो लिटर पाण्याची नासाडी!
-नारायण राणे भाजप खासदारकीचा राजीनामा देणार??? उचलणार मोठं पाऊल
–मलायका म्हणते… ‘कबूल किया मैंने उसको और उसके प्यार को!’
–फारूख अब्दुल्ला म्हणतात, आम्ही भारतीयच पण…
-गिरीश महाजन देशातील मोठे नेते आहेत- संजय राऊत
Comments are closed.