‘देवेंद्र फडणवीस तर तेव्हा चड्डीतच असतील’; रूपाली पाटलांनी भाजपला सुनावलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या आहेत. मात्र, आता प्रचार संपल्यानंतर भाजपने (BJP) पैसे वाटप केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याबाबत एक व्हिडीओ देखील काँग्रेसकडून (Congress) शेअर करण्यात आला आहे.

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) भाजपने पैसे वाटल्याचा आरोप करत उपोषणाला बसल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) या देखील आक्रमक झाल्याचं पाहायला. भाजपने प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्येश्वर मंदिराचा मुद्दा उचलला. यावर रूपाली पाटील ठोंबरेंनी भाष्य करत भाजपवर सडकून टीका केली आहे.

पुण्येश्वर मंदिराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहे. हे प्रकरण खूप जूनं आहे. माझा जन्मही झाला नव्हता तेव्हाचा हा वाद आहे फडणवीस तर चड्डीतच असतील, असं म्हणत रूपाली ठोंबरे यांनी फडणवीसांना सुनावलं.

भाजपची इतकी वर्ष सत्ता होती. त्यांनी काय केलं इतके वर्ष. फडणवीसांनी आत्ताच का हा मुद्दा काढला. पण इतक्या वर्षात बापटांनी किती निधी दिला हे पण सांगावं फडणवीसांनी, असं रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्यात.

दरम्यान, हिंदू-मुस्लिम ऐक्याला ठेच पोहचवणारं हे सरकार आहे. जेव्हा तुम्ही सत्तेत येतात तेव्हा तुम्ही जात-पात न पाहता काम केलं पाहिजे. रवींद्र धंगेकर जिथून निवडून येतात तिथे सगळ्या जाती-धर्माची लोकं आहेत. भाजप म्हणतं की कसबा हा आमचा बालेकिल्ला.. पण कसबा हा कोणाची मक्तेदारी नाही, असं त्यांनी सुनावलं.

महत्त्वाच्या बातम्या-