बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लेखक राज ठाकरेंना म्हणाले, जगाला हेवा वाटेल अशी सेटलमेंट, रूपाली पाटील म्हणाल्या, ‘तुला सोडणार नाही…’

पुणे | लेखक घनश्याम पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी या संदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. घनश्याम तू लेखक म्हणून बिकावू तर आहेस पण माणूस म्हणून नीच आहेस, अशा शब्दांत रुपाली पाटील ठोंबरे यांनी घनश्याम पाटील यांचा समाचार घेतला आहे.

स्वतःच स्टेलमेंट करून लेख लिहिणाऱ्याचा तीव्र धिक्कार, निषेध…. घनश्याम तू लेखक म्हणून बिकावू तर आहेस पण माणूस म्हणून नीच आहेस. मा. राज साहेब ठाकरेंबद्दल लिहायला तू एक सेटलमेंटचा पुरावा दे की तुला कायदेशीर कारवाई तर करणार पण बिकावू लेखक म्हणून मनसे चोप पण देणार, असं रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्यात.

तूच काढ पक्ष आणि चालवून दाखव. आमच्या साहेबांबद्दल लिहिताना जरा वास्तव्याचे, खरी परिस्थिती लिहिण्याचे धैर्य तुझ्यासारख्या स्वतःला लेखक म्हणाऱ्याकडे नाही. असो तू लेखक म्हणून छपरी आहेसच पण माणूस म्हणून तू बिकावू ,मानसिक रुग्ण आहेस, अशी टीका रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांनी सातत्याने ज्या भूमिका बदलल्या, त्या पाहता या पक्षाच्या भवितव्याची काळजी वाटते, अशा आशयाचा ब्लॉग ‘चपराक’चे संपादक आणि प्रकाशक घनश्याप पाटील यांनी लिहिला आहे. यानंतर मनसे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘…म्हणून आम्ही सर्वांना कोरोना लस देत नाही’; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं कारण

‘…अन्यथा उद्रेक होईल’; उदयनराजेंचा राज्य सरकारला इशारा

गृहमंत्रिपदी विराजमान होताच दिलीप वळसे पाटलांचा पोलीस अधिकाऱ्यांना इशारा

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, पहिल्या मॅचमध्ये खेळणार नाही ‘हा’ स्टार खेळाडू

पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More