Loading...

“चंद्रकांत पाटील, तुम्हाला भाऊ म्हणून दादा म्हणावं की गुंड म्हणून???”

पुणे | चंद्रकांत पाटील, तुम्हाला भाऊ म्हणून दादा म्हणावं की गुंड म्हणून दादा म्हणावं, असा सवाल मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना केला आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांना गणेशोत्सवापासून दूर राहण्याचे आदेश पुणे पोलिसांनी दिले आहेत. यानंतर रूपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

Loading...

पोलिसांनी रूपाली पाटील यांच्या नावाने नोटीसही जारी केली आहे. रूपाली पाटील यांना 13 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत झोन एकच्या हद्दीत राहण्यास आणि प्रवेश करण्यास मनाई केली आहे. राजकीय हेतूने मला नोटीस पाठवली आहे, असा आरोप रुपाली पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केला आहे.

दरम्यान, काहीदिवसांपूर्वी रुपाली पाटली यांनी डीजे प्रकरणावरुन चंद्रकांत दादांना गणेश मंडळाचे अध्यक्ष व्हावं, असं आव्हान केलं होतं.

Loading...

महत्वाच्या बातम्या- 

Loading...

 

 

 

Loading...