पुणे महाराष्ट्र

“तुम्ही नीच पात्रता दाखवली पण तुमच्या टीकेला प्रत्युत्तर द्यायला मनसैनिक खंबीर आहेत”

पुणे | सामनाच्या अग्रलेखात राज ठाकरेंच्या महसूल वाढवण्यासाठी दारुविक्री सुरु करण्याच्या सूचनेवर अनेक उपरोधात्मक टोले लगावले होते. यावरून मनसे नेत्या रूपाली पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

सरकारमध्ये आहात म्हणून महसूल वाढीच्या सूचना दिल्या आहेत. तुमच्या टीकेला उत्तर द्यायला मनसैनिकच खंबीर आहेत, असं म्हणत रूपाली पाटील यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

कोरोनाच्या काळात टीके पेक्षा महाराष्ट्र, महाराष्ट्रातील जनता जगणं गरजेचं आहे म्हणून पत्र. मात्र तुम्ही टीका करून नीच पात्रता दाखवलीच, अशा शब्दांत रूपाली पाटील यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे

दरम्यान, काही लोकांना राजद्वेषाचा मूळव्याध झाल्याचं म्हणत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय.

 

ट्रेंडिंग बातम्या-

गृहमंत्री अनिल देशमुखांनी आजीबाईंना स्वत: घातला मास्क

लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने बंदच राहणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचं स्पष्टीकरण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या