“राक्षसी वृत्तीचं मुंडकं छाटल्याशिवाय मसनातील महाकाली शांत होणार नाही”
पुणे | भाजपनं आज ओबीसी राजकीय आरक्षणासाठी मोर्चा काढला होता. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका केली. या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय.
स्वयंपाक घरात असणारी महिला अन्नपूर्णा देवी असते. मसनात असणारी महाकाली असते, ती महाकाली तुमच्यासारख्या राक्षसाच्या वृत्तीचे मुंडके छाटल्याशिवाय शांत होत नसते, अश्या शब्दात रूपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढवलाय.
तुम्ही खासदार आहात ना, मुख्यमंत्र्यांची भेट कशी घेतात, हे तुम्हाला माहित नाही? शिष्टमंडळ पाठवायचं असतं एवढंही माहित नाही. आता तुम्ही घरी जाण्याची वेळ आली आहे, असं ते म्हणालेत.
तुम्ही राजकारणात कश्यासाठी राहत आहात. घरी जा, स्वयंपाक करा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवाय मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रोटोकॉलही समजावला.
थोडक्यात बातम्या –
अनिल पवारांवरील कारवाईनंतर अजित पवारांचा खळबळजनक आरोप, म्हणाले…
“अनिल परब यांनी आता कपड्यांची बॅग तयार ठेवावी”
मोठी बातमी! परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर ईडीची धाड
“आधी संघाच्या कार्यकारिणीमध्ये सर्व जातींना आरक्षण देण्याचा ठराव करा, मग आमच्यावर बोला”
धक्कादायक बातमी समोर; अभिनेत्री विदीशा मुजूमदारचा मृत्यू
Comments are closed.