पुणे | ह.भ.प. इंदुरीकर महाराज देशमुख सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थनासाठी अनेक जण पुढे आले आहेत, तर काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे. अशातच मनसेच्या नेत्या रूपाली पाटील यांनी इंदुरीकर महाराजांच्या बोलण्यात काही आक्षेपार्ह आहे असं मला वाटतं नाही, असं म्हणत महाराजांना पाठिंबा दिला आहे.
‘थोडक्यात’शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हे माझं वैयक्तिक मत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. महाराजांनी मुलगा-मुलगी जन्मासंदर्भात दिलेला दाखला हा धर्मशास्त्रात तर आहेच पण वैद्यकीय शास्त्राच्या अभ्यासक्रमात देखील आहे. मग महाराजांचं वक्तव्य एवढचं जर आक्षेपार्ह असेल तर सरकारने वैद्यकीय शास्त्राचा अभ्यासक्रम का बदलला नाही, असा सवाल त्यांनी केला आहे.
इंदुरीकर महाराजांनी जरी पुत्रप्राप्तीचा ऑड-इव्हन फॉर्म्युला सांगितला असला तरी त्यांनी असं कुठं सांगितलंय की तुम्ही मुलगाच जन्माला घाला किंवा मुलगीच जन्माला घाला… महाराज आपल्या कीर्तनात जसं स्त्रियांना बोलतात तसं पुरूषांनाही बोलतात, हे टीकाकार महिलांनी लक्षात ठेवायला हवं, असं त्या म्हणाल्या आहेत.
इंदुरीकर महाराजांची भाषा ही रांगडी आणि ग्रामीण आहे. त्यांना ऐकण्यासाठी हजारो लोक तिथं जातात मग ती लोकं काय मूर्ख आहेत का?? असा सवाल त्यांनी महाराजांच्या टीकाकारांना विचारला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे वागणार नाही ना… मला काही सांगायचं आहे”
“महाराजांनी फक्त आवाज द्यावा आम्ही संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्या समर्थनार्थ उतरू”
महत्वाच्या बातम्या-
शिवसेनेत नाराजीनाट्य!; भास्कर जाधवांनी झटकला राऊतांचा हात
स्वतंत्र लढले असते तर मुख्यमंत्री झाले असते का?; चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना सवाल
“महाराजांनी फक्त आवाज द्यावा आम्ही संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्या समर्थनार्थ उतरू”
Comments are closed.