Top News महाराष्ट्र मुंबई

“संमतीने ठेवलेले संबंध हा बलात्कार नसतो, 2006 पासून 2020 पर्यंत का शांत बसला?”

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या तरूणीने 2006 मध्ये बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र अशातच मनसे नेत्या रूपाली पाटील यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ज्या वेळी अत्याचार झाला त्याच वेळी गुन्हा दाखल करायचा होता. 2006 पासून 2020 पर्यंत का शांत बसला?, बलात्कार हा त्या महिलच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने होत असतो. संमतीने ठेवलेले संबंध बलात्कार हा बलात्कार नसतो असं रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

राजकारणांनो बलात्कार हे तुमच्या राजकारण खेळी बनवून नका आणि बायांनो तुमच्या संमतीचे शाररिक संबंध हे राजकारणात कोणाला वापरून देऊ नका. तुमच्या मुळे आमच्या खरोखर पीडित बलात्कार झालेल्या अन्याय झालेल्या भगिनींला न्याय मिळत नाही. याची एक महिला म्हणून लाज बाळगा, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपामुळे भाजपने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘कोरोना लसीवर विश्वास नसेल तर पाकिस्तानात निघून जावं’; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

17 वर्षीय दिव्यांग मुलीवर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

‘निवडणुकीत पुरुष नेत्यांशी संपर्क असेल तरच महिलांना तिकीट’; राष्टीय महिला आयोगाच्या अध्यक्षांचं वक्तव्य

कलियुगातील संजीवनी मुंबईत आली- महापौर किशोरी पेडणेकर

भंडारा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्यपालांकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या