Top News महाराष्ट्र मुंबई

“पाटील साहेब, तुम्ही टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करता, मनसेवाले टप्प्यात आणून करतात”

photo credit- rupali patil thomare facebook account

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रसिद्धीची गरज आहे म्हणून ते वीजबिलावरून आरोप करत आहेत, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेवरून मनसेच्या पुणे शहराध्यक्ष रूपाली पाटील यांनी पाटलांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला आहे.

जयंत पाटील आज मंत्री आहेत ऊर्जा मंत्रिपदी आपल्या सरकारमधील मंत्री आहे. वीजबिलाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना लुबाडण्याचं काम होतं आहे. त्यामुळे सरकार म्हणून तुम्हाला हा जाब विचारण्यात आला आहे. कोणाला प्रसिद्धीची गरज आहे हे सर्व जनतेला माहिती असल्याचं रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.

पाटील साहेब, तुम्ही टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करता पण मनसेवाले टप्प्यात आणून कार्यक्रम करतात. त्यामुळे नको ती वक्तव्ये करण्यापेक्षा आपण सर्वसामान्यांच्या वीजबिलाचा प्रश्न मार्गी लावावा हीच विनंती, असं म्हणत रूपाली पाटलांनी जयंत पाटलांना टोला लगावला.

दरम्यान, राज ठाकरेंन प्रसिद्धीची गरज होती म्हणूनच का  खासदारकीच्या निवडणुकांवेळी त्यांनी एक सभा घ्यावी म्हणून आपण प्रयत्न करत होतात, असंही रूपाली पाटील म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या-

आता मोदींनाच विचारायला हवं खरे मोदी कोण?- छगन भुजबळ

“कधी-कधी वाटतं, पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेसची खरी गरज”

सचिन आणि लता मंगेशकर यांचा महाराष्ट्र सरकारला अभिमान वाटला पाहिजे- रामदास आठवले

बिग बाॅस फेम राहुल वैद्य दिशा परमारसोबत बांधणार लगीनगाठ!

‘शिवसेना हे आमचं जुनं प्रेम त्यामुळे…’; नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना व्हॅलेंटाईन गिफ्ट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या