मुंबई | महाविकास आघाडी सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी करत त्यामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी सरकारला टोला लगावला आहे.
ज्यांच्याकडे एवढी महाराष्ट्र सैनिकांची सुरक्षा आहे त्यांची काय झेड सुरक्षा काढून तीर मारणार आहात, असं रुपाली पाटील-ठोंबरे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.
शेवटी महविकास आघाडीपण भाजप सारखी कुच्या मनाचीच ना, असंही रूपाली पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हणत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, राज ठाकरेंना झेड सुरक्षा व्यवस्था होती. आता वाय प्लस एक्सकॉर्टसह सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
थोडक्यात बातम्या-
आमचं संरक्षण केवळ पोलीस करतो असं नाही- रावसाहेब दानवे
‘इतर नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे तर….’; शरद पवारांची गुगली
अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा हाॅट अंदाज; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस
ऑस्ट्रेलियन चाहत्यांकडून पुन्हा वर्णद्वेषी टीका, खेळ थांबवण्याची आली वेळ, पहा व्हिडीयो