बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चानंतर रूपाली पाटील शिवसेनेच्या वाटेवर?, ‘त्या’ भेटीमुळे गुढ वाढलं

मुंबई | डॅशिंग नेत्या म्हणून ओळख असलेल्या रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी मनसेला मोठा धक्का दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पुणे दौऱ्याआधीच रूपाली पाटील यांनी मनसेतील सर्व पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.

मनसेला (MNS) रामराम ठोकल्यानंतर रूपाली पाटील मनगटावर घड्याळ बांधणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. रूपाली पाटील राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार असल्याची चिन्ह दिसत असताना रूपाली यांनी शिवसेना (Shivsena) नेत्यांची भेट घेतल्याने आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

रूपाली पाटील यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ व युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई (Varun Sardesai) यांची भेट घेतली आहे. युवासेनेच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून या भेटीचा फोटो शेअर केल्याने राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रूपाली पाटील पक्षांतर्गत वादामुळे नाराज होत्या. त्यामुळे रूपाली पाटील लवकरच पक्ष सोडतील असा अंदाज वर्तवला जात होता. त्यानूसार रूपाली पाटील यांनी ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला रामराम ठोकला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! 31 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत नवीन नियमावली, ‘हे’ असणार नवे नियम

Omicron | परदेशातून आलेले ‘ते’ 38 प्रवासी बेपत्ता, राज्याची धाकधूक वाढली

रुपाली ठोंबरेंच्या राजीनाम्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“मोदींनी डुबकी मारलेल्या त्याच गंगेत कोरोना काळात हजारो प्रेते वाहत होती”

लग्नानंतर विकी-कतरिना पहिल्यांदाच मिडियासमोर, विककॅटच्या लूकनं वेधलं लक्ष

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More