बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…हा सातत्याने भुंकताना दिसतोय’; रूपाली ठोंबरेंनी मोहित कंबोज यांना झापलं

पुणे | भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक ट्विट केलं आहे. याच ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक याच्यानंतर आता तिसऱ्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा नंबर असल्याचं मोहित कंबोज यांनी ट्विटद्वारे म्हटलं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे-पाटील (Rupali Thombare-Patil) यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

हा परप्रांतीय असून तो आमच्या राज्यात येऊन सातत्याने विरोधकांना धमक्या देत आहे. पण आम्ही लक्ष देत नाही. कारण असे फालतू मोहित कंबोज सातत्याने भुंकताना दिसत आहेत, अशी टीका रूपाली ठोंबरे-पाटील यांनी केली आहे. दरम्यान रूपाली ठोंबरे-पाटील यांनी राज्य सरकारवर देखील आरोप केला आहे. सुडबुद्धीसाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

भाजपचा कुठलाही नेता उठतो आणि म्हणतो हा नेता आत जाणार, याच्यावर कारवाई होणार. यात काही कायदेशीर थारा नाही. भाजपच्या नेत्यांकडून ईडी, सीबीआयचा गैरवापर करून ज्याला क्लिनचीट दिली असेल तरी पुन्हा चौकशी करायला लावणं हा पोरखेळ आहे. हा पोरखेळ तुम्ही थांबवणार आहात का?, असा सवाल त्यांनी भाजपला केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

देवेंद्र फडणवीसांचं दिल्ली दरबारी वजन वाढलं; पक्षाने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

विनायक मेटेंच्या ड्रायव्हरबाबत धक्कादायक माहिती समोर!

सुप्रिया सुळेंनी अमित शहांकडे केली ‘ही’ मागणी

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोदी सरकारचा मोठा निर्णय

‘…तो भाजपचा प्लॅन बी’; ‘या’ महिला नेत्याचा भाजपवर गंभीर आरोप

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More