कसबा पोटनिवडणूक रूपाली पाटील-ठोंबरे लढवणार?, ठोंबरेंचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे| पुण्यातील कसबा मतदार संघाच्या भाजप(BJP) आमदार मुक्ता टिळक(Mukta Tilak) यांचं गुरूवारी निधन झालं आहे. त्यामुळं आता आमदारकीची एक जागा रिक्त झाली आहे. आता या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

आता ही पोटनिवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रवादीच्या(NCP) नेत्या रूपाली पाटील- ठोंबरे(Rupali Thombare Patil) इच्छुक असल्याचे चित्र दिसत आहेत. कारण सोमवारी माध्यमांशी बोलताना ठोंबरे म्हणाल्या की, जर पक्षाने आदेश दिले तर आम्ही निवडणूक लढवण्यास तयार आहे.

जी पोटनिवडणूक लढवली जाणार आहे, त्यात पक्षाने आदेश दिले तर मी ही निवडणूक लढवणार आहे. पण पोटनिवडणूक जाहीर झाली पाहिजे. आम्ही तर तयार आहोत पक्षाच्या आदेशासाठी, असंही यावेळी ठोंबरे म्हणाल्या.

ही पाटनिवडणूक बिनविरोधी व्हावी असं वाटत नाही का?, असा प्रश्न पत्रकारांनी ठोंबरेंना विचारला. यावर उत्तर देताना ठोंबरे म्हणाल्या की, पोटनिवडणुका बिनविरोधी कराव्या, पण ही अपेक्षा कोणी ठेवावी, ज्यांनी सगळ्याच पोटनिवडणुका बिनविरोधी घेतल्या असतील.

दरम्यान, पोटनिवडणुकीमध्ये जनता जो कौल देईल तो सर्वांनी मान्य केला पाहीजे, असंही ठोंबरे यावेळी बोलताना म्हणाल्या. परंतु आता खरच ठोंबरे ही पोटनिवडणूक लढवणार का याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-