Top News

मनसे नेत्या रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी!

पुणे | पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने रूपाली पाटील ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं कळतंय.

धमकीला मी घाबरणारी नाही. विद्यार्थी, शिक्षकांच्या अधिकार आणि हक्कांसाठी मी लढत राहीन, अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी व्यक्त केली आहे.

अज्ञाताविरोधात रुपाली पाटील यांनी पुणे पोलिसांत तक्रार दिली आहे. धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणीही रूपाली पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे.

निवडणुकीच्या निमित्ताने रविवारपासून रुपाली पाटील ठोंबरे सातारा दौऱ्यावर आहेत. या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सुरक्षा पुरविण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

भाजपने ठरवलं तर महिला मुख्यमंत्री करायला वेळ लागणार नाही- चंद्रकांत पाटील

“जोपर्यंत वीज बिल 50 टक्के माफ होत नाही, तोपर्यंत ती भरू नका”

कॉमेडियन भारती सिंहच्या घरी NCBची धाड; भारती सिंह आणि पती हर्ष ताब्यात

“…त्यामुळे मुंबई महापालिका शिवसेनेसाठी सोडली होती”

“लस देताना सामान्य आणि व्हिआयपी असा भेदभाव नको, सर्वांचाच जीव सारखाच”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या