“महिलांवर हात उगारणं ही त्यांची संस्कृती?, आम्ही त्यांना सोडणार नाही”
मुंबई | पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात जोरदार राडा झाला. स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात महागाईच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीने आंदोलन केलं. बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात भाजप कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. दरम्यान, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला.
जपच्या महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांना सध्या ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आता याप्रकरणावरून रूपाली पाटील यांनी भाजपवर सडकून टीका केलीये.
महिलांवर हात उगारणं ही त्यांची संस्कृती आहे. मात्र आम्ही त्यांना सोडणार नाही, असा इशारा रूपाली पाटील यांनी भाजपला दिला आहे.
स्वतःच्या बायकोला लोक बोलली तर इतरांना पुढे करता का ? इतरांच्या महिलांना मारहाण होते तेव्हा काय ? विचारला सवाल रुपाली पाटलांची उपस्थित केला. आता गुन्हा दाखल झालाय अटक कारवाई करा, आता सुरुवात आहे अजून करारा जवाब मिळेल, असं रूपाली पाटील म्हणाल्यात.
थोडक्यात बातम्या-
“आम्हाला 2024 ला पुन्हा मुख्यमंत्री पदी ब्राह्मण समाजाचे देवेंद्रे फडणवीस हवेत”
रावसाहेब दानवेंच्या ‘त्या’ वक्तव्याला आता रामदास आठवलेंचा पाठिंबा
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाची नारायण राणेंनी उडवली खिल्ली, म्हणाले…
अँड्र्यू सायमंड्सच्या मृत्यूचं गूढ वाढलं, बहिणीने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे खळबळ
“उद्धव ठाकरेंना राज्याचे मुख्यमंत्री म्हणण्याची लाज वाटते”
Comments are closed.